नवनिर्माण सेनेतर्फे कोकणच्या चाकरमान्यांसाठी मोफत बस सेवेचा शुभारंभ
गणेशोत्सवानिमित्त एकीकडे कोरोनाचे राजकारण सुरु असताना मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सोमवारी रात्री कोकणच्या चाकरमान्यांसाठी मोफत बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मनसे नेते अभिजित पानसे, जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव व इतर मनसैनिक उपस्थित होते.
जिथे सरकार कमी पडते तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे येते, सरकार अपयशी असल्यामुळे आम्हाला लोकांसाठी सोय सुविधा करायला लागते, असे मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले. तर दुसरीकडे परप्रांतीयांसाठी हे सरकार विशेष रेल्वे आणि एसटी विशेष सोय करते. मात्र, मराठी माणसांनाच या पासून वंचित का ठेवले जाते असा सवाल मनसे नेते अभिजित पानसे यांनी केला.
www.konkantoday.com