टॉयलेट लोकेटर फिचर अॅप मुळे शहरातील शौचालय काही मिनिटांतच शोधू शकणार
विविध कामासाठी आपण शहरात येतो अनेक वेळा शौचालयाची गरज लागते मग त्याची शोधाशोध सुरू होते आता ही समस्या संपणार आहे.आता तुम्ही गुगल मॅपवर तुमच्या जवळ असलेले शौचालय काही मिनिटांतच शोधू शकणार आहात. प्रवास करताना सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे गरज भासल्यास सार्वजनिक शौचालय शोधणे. मात्र, ही ती चिंता आता मिटणार आहे. केंद्र सरकारने लू रिव्यू अभियानांतर्गत ही सार्वजनिक शौचालये जोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यात ३०६ सार्वजनिक शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे.
केंद्र सरकारने लू रिव्यू अभियानांतर्गत गुगलच्या सहाय्याने घर व शहरी भागातील शौचालये जोडण्यास सुरुवात केली आहे. टॉयलेट लोकेटर फिचर अॅपमुळे सुविधा देणे सोपे झाले झाले आहे.
www.konkantoday.com