गुहागर- वेळणेश्वर कोविड सेंटरमधील कचरा उघड्यावर टाकण्याचा धक्कादायक प्रकार
गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरच्या परिसरात पीपीई कीट, हॅण्डग्लोज, मास्क आदी कोरोनाग्रस्त रूग्णांचे साहित्य विल्हेवाट न लावता तसेच उघड्यावर टाकण्यात आले आहे. या कचर्यामुळे कोरोना हवेत पसरून गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. तसेच कचरा टाकण्यात आलेल्या परिसरातील पाणी नाल्यातून लगतच्या गावांना जावून येथील नागरिकांना पाण्यातून संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.
गुहागर तालुक्यात सुरूवातीला कोविड सेंटरसाठी इमारत मिळत नव्हती. अशावेळी गावापासून दूर असे वेळणेश्वर येथे अभियांत्रिकी महाविद्यालयाने शासनाच्या विनंतीचा मान राखून आपले वसतीगृह कोविड सेंटरसाठी दिले. मात्र एप्रिल महिन्यापासून सुरू झालेल्या कोविड सेंटरच्या इमारतीचे भाडे, वीज बिल, कर्मचारी पगार असे विनंत्या करूनही यातील काहीच तालुका प्रशासनाने महाविद्यालय प्रशासनाला दिलेले नाही. या कोविड सेंटरच्या परिसरात चहुबाजूला कोरोनाग्रस्त रूग्णांनी वापरलेल्या वस्तूंचा कचरा साठला आहे.
www.konkantoday.com