शासकीय कोविड रूग्णालयातील (सिव्हिल हॉस्पिटल) आरोग्य सुविधांची चौकशी व्हावी -माजी आ. हुस्नबानु खलिफे
रत्नागिरी कोविड रूग्णालयातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या, रूग्णांचे मृत्यूचे प्रमाण पाहता जिल्हा रूग्णालयात आरोग्य सुविधा आहेत की नाहीत असा प्रश्न उपस्थित होत आहे. रूग्णांचा स्वॅब टेस्टवरील विश्वासच उडाला आहे. डॉक्टरांनाच जीव गमवावा लागत आहे अशी गंभीर स्थिती जिल्हा रूग्णालयात असून जिल्हा रूग्णालयातील आरोग्य सुविधांची चौकशी व्हावी अशी मागणी माजी आमदार सौ. हुस्नबानू खलिफे यांनी केली आहे.
www.konkantoday.com