
रत्नागिरी शहरानजीक क्रांतीनगर येथे चिरे खाणीत बुडून मुलाचा मृत्यू
रत्नागिरी शहरानजीक असलेल्या क्रांतीनगर झोपडपट्टीत राहणारा उस्मान रिफाई हा पंधरा वर्षाचा मुलगा पोहण्यासाठी चिरेखाणी गेला असता त्याचा बुडून मृत्यू झाला
उस्मान हा काल रविवारी क्रांतीनगर येथे जवळच असलेल्या चिरेखाणी वर पोहण्यासाठी गेला होता तो त्यानंतर परतला नव्हता सायंकाळी साडेचारच्या सुमाराला चिरे खाणीत उस्मान बुडालेल्या चे कळल्यावर त्याच्या घरच्यांनी तेथे धाव घेतली त्याला बेशुद्धावस्थेत शासकीय रुग्णालयात आणण्यात आले परंतु तेथे तो मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले
www.konkantoday.com