
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने मागेल त्या गावी एसटी हा उपक्रम सुरु
गणेशोत्सवामध्येकोकणवासीयांना आपल्या गावी जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने मागेल त्या गावी एसटी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. यासाठी दोनशेहुन अधिक एसटी बसेसचं बुकिंग कोकणवासियांनी केललं आहे. 10 ते 12 तारखेपर्यंत याहून अधिक एसटी बसेसची मागणी असल्याने त्याही कोकणवासीयांना पुरवण्यात येणार आहेत.कोरोनाच्या काळात कोकणात सुरक्षित आणि कमी दरात आपल्या गावी जाता यावं यासाठी चाकरमान्यांनी एसटीचा पर्याय निवडलेला आहे. आपल्या गावी जाण्यासाठी कोकणवासीय कुर्ला, परळ, मुंबई सेंट्रल, मैत्री पार्क या परिसरातील विभागात जाऊन एसटीचे बुकिंग करत आहेत. महामंडळाने या सेवेसाठी ॲप द्वारे बुकिंग सुरु केलेले आहेत. यालाही कोकणवासीय चांगला प्रतिसाद देत आहेत.
www.konkantoday.com