गणेशमूर्ती शाळांमध्ये लगबग सुरु
रत्नागिरी :- सर्व कोकण वासीयांचा आवडता सण म्हणजे गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे अनेक गपणती करखान्यात गणेशमूर्तीवर रंगकाम करायला लगबग सुरू झाली आहे. सध्या कोरोनाचे संकट असल्याने यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा असा शासनाचा निर्णय आहे .मात्र त्या साधेपणातही भक्तिभाव मांगल्या आणि चैतन्याचे प्रतिक असलेला आपला लाडका बाप्पा आवडीनुसार आपल्या घरी स्थानपन्न करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. फूडच्या वर्षी लवकर या,असा भक्तिपूर्ण निरोप देतात तेव्हापासून गणेश भक्त पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवाची वाट पाहत असतात .अनेक कारागीर त्या कामात गुंतले असल्याचे दिसून येते . भक्तांचा उत्साह कायम आहे , असे रत्नागिरी येथील मूर्तिकार निलेश पानगले यांनी सांगितले आहे .
www.konkantoday.com