
कोकणात सोडण्यासाठी मध्य रेल्वेने रेल्वे मंडळाकडे प्रस्ताव पाठवला ,लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता
गणपती उत्सवासाठी चाकरमान्यांना कोकणात सोडण्यासाठी मध्य रेल्वेने रेल्वे मंडळाकडे प्रस्ताव पाठवला आहे. लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे, झाल्यास कोकण मार्गावरून रेल्वेच्या सुमारे 208 फेऱ्या धावतील.
कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सध्या फक्त एसटीची सुविधा आहे. त्यानंतर आता कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वे चालवण्यासाठी राज्य सरकार आणि मध्य रेल्वे आग्रही आहे. तसा प्रस्ताव केंद्रीय गृह विभाग आणि रेल्वे मंडळाकडे पाठविण्यात आला आहे. मध्य रेल्वे मार्गाचे जनसंपर्क अधिकारी कार्यालय आणि मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना यासंबंधीच विचारले असता अद्याप रेल्वे मंडळाने मान्यता दिली नसून, मान्यता मिळाल्यानंतर अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल
प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर 11 आॅगस्ट ते 3 सप्टेंबरपर्यंत या फेऱ्या धावण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com