
मूर्तीच्या उंचीवरून कारवाई करू नये- नामदार उदय सामंत
गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांना प्रशासनाने आपुलकीची वागणूक द्यावी, गणेशमूर्ती दोन फुटांची असावी, असा नियम आहे; पण कोकणात मोठ्या मूर्तींची परंपरा आहे. या मूर्ती सहा ते सात महिन्यांपूर्वीपासून निश्चित केलेल्या असतात. त्याचा विचार करता मूर्तीच्या उंचीवरून कारवाई करू नये, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या.
www.konkantoday.com