
रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर मध्ये चोरी करणाऱ्या चोरट्यास शहर पोलीस ठाण्याकडून अटक
दि. 27/01/24 रोजी पहाटे मारुती मंदिर येथील मंदिरात अज्ञात इसमाने चोरी-घरफोडी करून मंदिरात असणारी दान पेटी फोडून पैसे चोरी केले बाबत 04:30 वा सुमारास शहर पोलीस ठाण्याच्या गुड मॉर्निंग स्क्वॉड मधील पोहेकॉ/२८२ संतोष सावंत यांना निरीक्षणा दरम्याने निदर्शनास आल्याने तात्काळ पहाटे ०५:३० वा शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक घटनास्थळी दाखल झाले व पाहणी करून शहर पोलीस ठाणे येथे मंदिराच्या ट्रस्ट कडून खबर मिळाल्याने गुन्हा रजिस्टर नंबर ३७/२०२४ भा.द.वि संहिता कलम 457, 380 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकामार्फत मारुती मंदिरातील सी.सी.टी.व्ही फुटेज तसेच शहरातील अन्य परिसरांमधील सी.सी.टी.व्ही फुटेज यांची लागलीच पडताळणी करण्यात आली तसेच गोपनीय माहितीच्या आधारे रत्नागिरी शहरामध्ये आरोपीचा शोध घेण्यात आला व आज दिनांक २७/०१/२०२४ रोजी विजय रमनेवल प्रजापती, वय 30 वर्षे, व्यवसाय मजुरी, सध्या राहणार कोकण नगर मूळ राहणार अलाहाबाद उत्तर प्रदेश याला ताब्यात घेण्यात आले आहे व मारुती मंदिरातील दान पेटी मधून चोरलेली एकूण ₹ 84,588/- रक्कम जप्त करण्यात आलेली आहे.
तसेच आरोपी विजय रमनेवल प्रजापती याने रत्नागिरी व अन्य ठिकाणी आणखी चोरी-घरफोडीचे गुन्हे केले आहेत का? याचा अधिक तपास या पथका मार्फत सुरू आहे.
ही कारवाई, गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या खालील नमूद पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी केलेली आहे,
1) पोलीस उपनिरीक्षक श्री. आकाश साळुंखे,
2) सपोफौ/७०८ श्री. दीपक साळवी,
3) पोहेकॉ/२८२ संतोष सावंत,
4) पोहेकॉ/५७४ अरुण चाळके,
5) पोहेकॉ/१३९९ अमोल भोसले,
6) पोहेकॉ/८७७ राहुल जाधव,
7) पोना/७५४ मयेकर व
8) पोशि/४८४ अमित पालवे
पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी यांनी या पथकास ₹१०,०००/- चे बक्षीस जाहीर केले आहे.
www.konkantoday.com




