स्वराज्याचा ठेवा आणि किल्यांचे सौंदर्य जपले नाही तर शिवाजी महाराजांचा नुसता जयघोष कामाचा नाही -खासदार संभाजीराजे
किल्ले संवर्धन आणि त्यांचे जतन होण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्गासह कोकणातील जलदुर्गांचे प्राधिकरण होण्याची आवश्यकता आहे. विजयदुर्ग किल्याची पडझड झाल्याचे वृत्त कानी येताच तातडीने दिल्ली गाठून पुरातत्व विभागासह सांस्कृतिकमंत्री प्रल्हाद पटेल यांची भेट घेतली. किल्याच्या डागडुजीचे अंदाजपत्रक बनवून पावसाळ्यानंतर कामाला सुरूवात होण्याच्या हालचालीबाबत संबधितांकडून आश्वासित केल्याचे खासदार संभाजी राजे यांनी विजयदुर्ग येथे सांगितले.
स्वराज्याचा ठेवा आणि किल्यांचे सौंदर्य जपले नाही तर शिवाजी महाराजांचा नुसता जयघोष कामाचा नसल्याचेही त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com