
नव्या इमारतीत जाण्यास दापोलीतील मच्छीविक्रेत्यांचा नकार
दापोली शहराच्या प्रवेशद्वारातच मच्छीविक्री करणार्या महिलांसाठी नगर पंचायतीने नवीन इमारत बांधली आहे. या इमारतीत मच्छीमार महिलांना स्थलांतरित करण्यासाठी, अनेक वर्ष प्रयत्न सुरू आहेत. मात्र हा यशस्वी झालेला नाही. या अनुषंगाने चर्चा करून निर्णय घेण्यासाठी नगर पंचायतीच्यावतीने मासेमारी विक्रेत्या भगिनी व मासेमार नेते यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या सभेत स्थलांतराचा प्रस्ताव मच्छी विक्रेत्यांनी धुडकावून लावला. यानंतर झालेल्या प्रचंड गदारोळामुळे ही सभा बरखास्त करण्यात आली.
दापोलीला पर्यटकांची मिळत असलेली पसंती टिकवून ठेवण्याच्या अनुषंगाने शहर स्वच्छ व सुंदर व वाहतुकीस सुसह्य असणे आवश्यक असताना शहरात मागील काही वर्षापासून अस्वच्छता, रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे वाढत आहे. यामुळे दापोलीच्या प्रवेशद्वारावरच असणारे दुर्गंंधीयुक्त मच्छीमार्केट स्थलांतरित करावे, यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. शहरात यापूर्वी सर्व सोयी-सुविधांयुक्त असे मच्छीमार्केट अपलब्ध नव्हते. मात्र आता मोक्याच्या ठिकाणी न.प.ने मटण व मच्छीमार्केटसाठी सुसज्ज इमारत बांधली. मात्र या इमारतीत जाण्यास आधीपासूनच नकारघंटा वाजवणार्या मच्छीमार विक्रेत्या महिलांनी या सभेतही तीव्र शब्दात विरोध दर्शविला.www.konkantoday.com