
आता कंपनी आणि केंद्र सरकार यानीच रिफायनरीची जागा निश्चित करायची आहे -उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे केंद्राकडे बोट
राजापूर तालुक्यातील बारसू येथे रिफायनरी होणार की नाही याबाबत आता चर्चा सुरू झाली असतानाच
रिफायनरी कुठे स्थापन करायची याचा निर्णय केंद्र सरकार आणि संबंधित कंपनीला घ्यायचा आहे. महाराष्ट्राला फक्त जमीन आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत, असे सांगून राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी रिफायनरीच्या वादावर मौन पाळणेच पसंत केले.
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी रिफायनरी विदर्भात स्थापन करावी याकरिता पत्र दिले आहे. सुरुवातीला ही रिफायनरी कोकणातील नाणार येथे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रिफायनरी स्थापन करणारी कंपनी परकी आहे. केंद्र सरकारने रिफायनरी महाराष्ट्रात स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता कंपनी आणि केंद्र सरकार यांनाच जागा निश्चित करायची आहे. स्थळ निश्चितीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. आम्हाला या समितीच्या निर्णयाची प्रतिक्षा आहे.” असे सांगून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी रिफायनरी जागेचा प्रश्नाबाबत केंद्राकडे बोट दाखविले आहे
www.konkantoday.com