मिरकरवाडा जेटीवर अजगराचे दर्शन
सध्या जंगली प्राणी मानवी वस्तीजवळ येण्याचे प्रकारात वाढ होत असून अनेक वेळा मानवी वस्तीजवळ बिबट्याचे व वन्यप्राण्यांचे दर्शन होत असते नुकत्याच मुंबईत पडलेल्या अतिवृष्टीत रेल्वे प्लॅटफॉर्मवर साचलेल्या पाण्यात चक्क मासे दिसल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले असतानाच आता मासेमारी साठी असलेल्या प्रसिद्ध मिरकरवाडा जेटीवर चक्क अजगर दिसले आहे जेटीवर सध्या वर्दळ कमी असल्याने अजगर सहजपणे वावरत असल्याचे दिसत होते तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी मात्र त्याला कॅमेरात कैद केले
www.konkantoday.com