
कामे पूर्ण करूनही ठेकेदारांना बिलाचे पैसे नाहीत
रत्नागिरी ः सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ठेकेदारांने मार्चमध्ये कामे पूर्ण करूनही अद्यापही त्यांना बिलाचे पैसे मिळालेले नाहीत. ठेकेदाराने वेळेवर काम करुनही त्यांचे पैसे न आल्याने ते अडचणीत सापडले आहेत. ठेकेदारांना बँकांचे कर्ज, मजुरांचा खर्च, अनामत रकमा यासाठी पैसा गुंतवावा लागतो. मात्र शासकीय कार्यालयाकडून वेळेत बिले न आल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत.