कोरोना लॅब तपासणी मशीन मधील तांत्रिक अडचण, अहवाल मिळण्याचे प्रमाण कमी झाले
दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक वेळा विद्युत रहा खंडित झाल्याने रत्नागिरी शासकीय रुग्णालयात कोरोना तपासणी लॅब मशीनच्या बॅटरीचा पार्ट गेल्याने तांत्रिक बिघाड झाल्याने गेले दोन दिवस पुरेशा प्रमाणावर तपासणी अहवाल येत नव्हते यातील तांत्रिक बिघाड दूर करण्यात येत असून त्यानंतर पूर्ण क्षमतेने तपासणी येऊ शकणार आहेत गेल्या दोन-तीन दिवसात अनेक तपासणी अहवाल प्रलंबित होते सध्या कोकणात चाकरमानी येऊ लागल्याने जिल्ह्यातील तपासणी केंद्रांची क्षमता वाढविण्यात येणार आहेत रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयातील कोरोना लॅब तपासणी दोन शिफ्टमध्ये चालते आता त्यामध्ये स्टाफ वाढवून ही तपासणी तीन शिफ्ट मध्ये केली जाणार आहे
www.konkantoday.com