आर्ट ऑफ लिव्हिंग पुणेतर्फे रत्नागिरी-रायगडमधील कुटुंबांना धान्याच्या कीटचे वाटप
निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील १०१३ कुटुंबाना आर्ट ऑफ लिव्हिंग (पुणे) महाएनजीओ आणि दशानेमा गुजराथी परिवाराने मदतीचा हात दिला आहे. या सर्व कुटुंबाना अन्नधान्य कीट, कपडे यांचे वाटप केले.
कोकणात निसर्ग चक्रीवादळामुळे अनेक घरे जमीनदोस्त झाली. आधीच कोरोनाच्या संकटामुळे सर्व व्यवसाय बंद असल्याने शेतकरी व सामान्यांना वादळाने जगणे कठीण झाले होते. या पार्श्वभूमीवर कोकणवासियांना असलेली तात्काळ मदतीची गरज ओळखून पुण्यातील आर्ट ऑफ लिव्हिंग महाएनजीओ आणि दशानेमा गुजराथी परिवाराच्या पदाधिकार्यांनी मदत साहित्य घेवून रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील वाड्या व वस्त्यांवर धाव घेतली. आपली सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी १०१३ कुटुंबांना अन्नधान्य किटचे वितरण केले.
www.konkantoday.com