
राज्यातील अतिवृष्टी लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या १६ टीम राज्याच्या विविध भागात तैनात
मुंबई, कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे उदभवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासनाची आपत्कालीन यंत्रणा सज्ज आहे. राज्यातील अतिवृष्टी लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या १६ टीम राज्याच्या विविध भागात तैनात करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासन व सर्व आपत्कालीन यंत्रणा सतर्क आहेत. तसेच जनतेला घरातच राहून सुरक्षित राहण्याचे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
मुंबईत ५, कोल्हापूर ४, सांगली २, सातारा १, ठाणे १, पालघर १, नागपूर १, रायगड १ अशा एकूण १६ एनडीआरएफच्या टीम राज्यातील विविध भागात तैनात करण्यात आल्या आहेत.
www.konkantoday.com