रत्नागिरीतील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टर दिलीप मोरे यांचे दुःखद निधन
रत्नागिरीतील प्रसिद्ध बाल रोग तज्ञ व शासकीय रुग्णालयातील प्रसिद्ध डॉक्टर दिलीप मोरे यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले गेले काही दिवस ते कोरोनाशी लढा देत होते त्यांच्या प्रकृतीत मध्यंतरी सुधारणा होत परंतु कालपासून त्यांची प्रकृती गंभीर होत आणि आज पहाटे यांचे दुःखद निधन झाले
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना च्या काळात त्यांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावली होती रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना झालेल्या छोट्या बालकांना त्यांनी कोरोना पासून मुक्त केले होते निवृत्तीनंतरही पाच-सहा वर्षे ते शासकीय रुग्णालयात सेवा बजावत होते त्यानंतर त्यांनी निवृत्तीची इच्छा व्यक्त केली असताना त्यांना कोरोना ची लागण झाली त्यामुळे गेले काही दिवस त्यांच्यावर रत्नागिरी येथील कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते त्यांचा कोरोनाशी लढा सुरू होता परंतु दुर्दैवाने आज त्यांचे निधन झाले त्यांच्या निधनामुळे रत्नागिरीकरांनी एक चांगला मनमिळाऊ डॉक्टर व खराखुरा कोरोना योद्धा गमावला आहे त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे
www.konkantoday.com