नोंदणी शुल्काविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे आंदोलनाचा इशारा
दापोलीः- नोंदणी शुल्काच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून ग्रंथालय, जिमखाना, मेडिकल, म्यागझीन अशा पध्दतीचे शुल्क वसूल केले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. या शुल्काबाबत योगय तोडगा काढावा अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोकण कृषि कार्यप्रमुख अक्षय जंगम यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांनी कृषि विद्यापीठाच्या प्रवेशासाठी नोंदणी सुरू केली. सर्व आर्थिक उत्पन्नाची साधने बंद असल्याने प्रवेश शुल्क भरण्यास विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होत आहे. अशातच महाविद्यालय विद्यार्थ्यांची दिशाभूल करत आणि शुल्क भरण्यास विद्यार्थ्यांना सक्ती करत आहेत. ही सक्ती न थांबवल्यास आंदोलन केले जाईल असा इशारा अक्षय जंगम यांनी दिला आहे
www.konkantoday.com