
तब्बल ४०तासानंतर चांदेराई बाजारपेठेतील पाणी कमी झाले,नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करावेत सरपंच शिल्पा दळी यांची मागणी
तब्बल ४०तासानंतर चांदेराई बाजारपेठेतील पाणी रात्री ११ वाजता कमी झाले व ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास टाकला. आज सकाळपासून सर्व बाजारपेठेतील दुकानदार आपल्या दुकानातील नुकसान झालेल्या वस्तू बाहेर काढून मोठ्या प्रमाणावर साठलेला चिखल काढत आहेत
महसूल खात्याने तात्काळ सर्व दुकानदार व्यापारी व काही बाधित घरांचे पंचनामे करावे अशी मागणी सरपंच शिल्पा दळी यांनी केली आहे
सार्वजनिक बांधकाम खात्याचे मेलकुली कामगार रस्त्यावरचा चिखल बाजूला करण्याचे काम करत आहेत तर चांदेराई च्या मोठ्या पुलावर मोठ्या प्रमाणावर घाण लाकडे कचरा अडकलेला साफसफाई करण्याचे काम सुरू आहे पुलाची काठड्याची व लोखंडी रेलिंगची मोठ्या प्रमाणावर मोडतोड झाली आहेआरोग्य खात्याकडून बाधित घरांची तपासणी सुरू आहे व मेडिक्लोर चे वाटप सुरू आहे वीजप्रवाह आज दुपारपर्यंत सुरळीत चालू होईल असे mecb प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे
www.konkantoday.com