कशेडी घाटात चाकरमान्यांचा खोळंबा होऊ नये म्हणून आमदार शेखर निकम यांचे प्रयत्न
मुंबईहून येताना कोकणात गणेशोत्सवासाठी येणारे चाकरमानी रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर कशेडी घाटात अडकल्याचे व चाकरमान्यांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा कशेडी तपासणी नाक्यापासून दूरवर लागल्याचे लक्षात आल्यानंतर चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी तपासणीमध्ये गती यावी, ही प्रक्रिया सुटसुटीतपणे व्हावी, घाटरस्ता असल्याने चाकरमान्यांचा तेथे खोळंबा होऊ नये, अशी मागणी दूरध्वनीवरून जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे केली. त्यामुळे तो प्रश्न निकालात निघाला.
श्री. निकम यांनी वस्तुस्थिती जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने याबाबत स्थानिक प्रशासनाला सूचना दिल्या आहेत
www.konkantoday.com