एस टी महामंडळाच्या संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणीमुळे चाकरमानी हैराण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गौरी-गणपती उत्सवासाठी गावी जाणार्‍या चाकरमान्यांना दिलासा देण्याकरता परिवहन मंत्र्यांनी ३ हजार एसटी बसेसची घोषणा केली. मात्र बुधवारी त्याची अमलंबजावणी करताना एसटी महामंडळाची तारांबळ उडाली. एसटीचे ऑनलाईन तिकीटांचे आरक्षण मध्यरात्रीपासून सुरु होईल असे जाहीर करण्यात आले होते. मात्र महामंडळाच्या अधिकृत संस्केतस्थळावर सकाळपासून तांत्रिक अडचणी येत असल्याने अनेकांना तिकीटांचे आरक्षण करता आले नाही. काल दुपारी १ नंतर तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या. मात्र यामुळे चाकरमान्यांची चांगलीच गैरसोय झालेली आहे.
www.Konkan today.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button