शासकीय रूग्णालयातील अपुर्या कर्मचारी वर्गाबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रभाव वाढत असून रत्नागिरी शासकीय आरोग्य यंत्रणेत वैद्यकीय अधिकार्यांची पदे कमी असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे सध्या मर्यादित अधिकार्यांच्या मदतीने आरोग्य खात्याचा कारभार सुरू आहे. कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासनाने तात्काळ वैद्यकीय अधिकार्यांची पदे भरण्याची कार्यवाही करणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने तात्काळ पदे भरण्यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही सुरू केली नसल्याने रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकार्यांच्या पदाच्या भरतीबाबत सामाजिक कार्यकर्ते खलील वस्ता यांच्यावतीने ऍड. राकेश भाटकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
www.konkantoday.com