राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील- निलंगेकर यांचे निधन
राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील- निलंगेकर यांचे निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. पुण्यातील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना किडनी विकारावरील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 16 जुलै रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
www.konkantoday.com