
रत्नागिरी शहर खड्डेमुक्त करण्यासाठी नगराध्यक्ष सरसावले
रत्नागिरी :रत्नागिरी शहरात विविध भागात पडलेल्या खड्ड्यांबाबत नागरिकांच्यात नाराजी निर्माण झाली होती. यामुळे नगर परिषदेच्या कारभारावर टीका होत होती. आता शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी नगर परिषदेने सुरूवात केली असून हे खड्डे बुजविण्यासाठी डांबर व खडीचा वापर केला जात आहे. रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी जातीने खड्डे भरण्याच्या कामाला भेट देवून कामाची पाहणी केली. पावसाने उघडीप दिल्यामुळे हे खड्डे भरण्याचे काम जोमात सुरू झाले आहे. यामुळे लवकरच रत्नागिरी शहर खड्डेमुक्त दिसेल अशी आशा नागरिकांनी बाळगण्यास हरकत नाही.
www.konkantoday.com