रत्नागिरीतील कोरोना तपासणी स्वॅब अहवाल २४ तासांत मिळावेत, अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन यांची मागणी
जिल्ह्यातून मिरज येथे स्वॅब पाठविल्यानंतर अहवाल २४ तासात येत होते. मात्र रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात कोविड तपासणी यंत्रणा आल्यानंतर कोरोनाचे अहवाल येण्यास उशीर का होत आहे. असा प्रश्न उपस्थित करत कोविड तपासणीसाठी आलेल्या स्वॅबचे अहवाल २४ तासात मिळावेत अशी मागणी कॉंग्रेस नेते अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन यांनी केली आहे.
रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात व जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी स्वॅब घेतले जातात, त्याचे अहवाल उशीरा येतात. त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होते. जिल्हा शासकीय रूग्णालयात कोरोनाचे संशयित रूग्ण येतात, त्यामध्ये बहुतांश अहवाल निगेटीव्ह असू शकतात.
ही सर्व परिस्थिती रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयातील प्रशासनाला माहित असून देखील जिल्हा शासकीय रूग्णालयातील या समस्येकडे डोळेझाक केली जात आहे का? असा प्रश्न हारीस शेकासन यांनी उपस्थित केला.
www.konkantoday.com