
पावसाचा जोर दुसऱ्या दिवशीही कायम,शहराला पुराचा धोका असल्याने नागरिकांना सतर्कचा इशारा
खेड : आज दुसऱ्या दिवशीही पावसाची संततधार सुरुच राहिल्याने तालुक्यातील जनजिवन विस्कळीत झाले आहे. खेड शहरालगत वाहणाच्या जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्या आजही धोक्याची पातळी ओलांडून वहात असल्याने नगरपालिका प्रशासनाने नागरिक आणि व्यापाऱ्यांना सतर्कतेच इशारा दिला आहे. या दोन्ही नद्यांच्या पाण्याचा विळखा शहराला कधी पडेल ही सांगता येत नसल्याने व्यापाऱ्यांसह नागरिकांचीही झोप उडाली आहे.
सोमवारी सायंकाळपासून सुरु झालेल्या संततधार पावसाने अद्याप उसंत अशी घेतलेलीच नाही. दिवस-रात्र पाऊस धो धो कोसळत असल्याने तालुक्यात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जगबुडी नदीचे पाणी मच्छिमार्केटपासून शहराकडे ऊसळी मारू लागले आहे तर नारंगी नदीचे पाणी दापोली नाका येथून शहरात शिरू लागले आहे.पावसाचा जोर असाच कायम राहिला तर खेडची बाजारपेठ कधीही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे व्यापारी आणि नागरिक सतर्क झाले आहेत. रात्री-अपरात्री शहराला पुराचा वेढा पडलाच तर खबरदारीचा उपाय म्हणून नगरपालिका प्रशासनाचे आपत्ती व्यवस्थापन सज्ज झाले आहे. मच्छिमार्केट परिसरात नगरपालिका प्रशासनाने एक बोट तैनात ठेवली असून-जिथे जिथे पाणी भरण्याची शक्यता आहे तिथे तिथे उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
संततधार पावसाचा तड़ाखा ग्रामीण भागालाही बसला आहे. तालुक्यातील किंजळे तर्फे नातू गावाला
जोडणाऱ्या कमी उंचीच्या पुलावरून पाणी वाहू लागले असल्याने या गावाचा तालुक्याशी असलेला सपर्क तुटला आहे. तालुक्यातील अन्य भागातही नद्या-नाल्याना पुर आला असल्यांने शेतक-्यानी खबरदारी घ्यावी अशा सुचनां तालुका प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
www.konkantoday.com
