
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. दुपारी १२.३० वाजता हा सोहळा पार पडेल. या सोहळ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. तसंच या परिसरात जाण्यासाठी निमंत्रण पत्रिकांवर हाय सिक्युरिटी कोड देण्यात आला आहे. या द्वारेच त्या व्यक्तीला भूमिपूजनाच्या स्थळी प्रवेश देण्यात येणार आहे. दरम्यान, भूमिपूजनाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून निमंत्रीतही या ठिकाणी येण्यास सुरुवात झाली आहे.
www.konkantoday.com