नाणार रिफायनरी प्रकरणी शिवसेनेची दुटप्पी भूमिका- माजी आमदार प्रमोद जठार
एकीकडे नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध करायचा, आणि दुसरीकडे त्याच रिफायनरी कंपनीकडून पैसे घेऊन जाहिराती छापायच्या असा दुटप्पी खेळ शिवसेनेकडून सुरू आहे. कोरोना महामारीत कोकणातील हजारो युवक बेरोजगार झाले आहेत. त्यांच्यासाठी रिफायनरी प्रकल्प ही सुवर्णसंधी आहे; पण शिवसेना आणि खासदार राऊत यांना इथे रोजगार निर्माण करायचे नाहीत असेच दिसून येते, अशी टीका भाजपचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी केली आहे.
www.konkantoday.com