
जिल्हा आरोग्य यंत्रणेने आरोग्य साधनांचा पुरेसा पुरवठा असल्याचे सांगितल्याने आपण आमदार निधीतून मास्कचे वाटप केले नाही -आ. भास्कर जाधव
कोविड विरोधी अभियानात पुरेशी साधन सामग्री आहे, अशी ग्वाही जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. कोणत्याही बाबींची कमतरता नाही. शासनाकडून पुरेसा पुरवठा होत आहे, असे सांगण्यात आल्यामुळे आपण आमदार निधीतील रक्कम मास्क, सॅनिटायझर यासाठी दिली नाही. या वस्तू आपण स्वतः मतदार संघात वाटल्याचे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी केले.
ते म्हणाले गुहागर तालुक्यात वेळणेश्वर येथे कोविड सेंटर उभारण्यासाठी लागणारा निधी आमदार निधीतून देण्यात आला. यासारख्या कामांची गरज लक्षात घेवून निधी देण्यात येईल तथापि लोकांना वाटण्यासाठी सॅनिटायझर, मास्कसाठी सरकारी निधी खर्च करणे योग्य वाटले नाही. म्हणून आपण त्यासाठी निधी दिला नाही. काही लोकांची गरज लक्षात घेवून आपण स्वतः त्या वस्तूंचे वाटप केले आहे.
www.konkantoday.com