
गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात येणार्या चाकरमान्यांना योग्य ती खबरदारी घेवून आणणार, एसटीने येणार्यांना पासची गरज नाही -जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा
रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी येणार्या चाकरमान्यांना योग्य ती खबरदारी घेवून आणण्यात येणार आहे. एसटीने येणार्यांना फक्त पासची गरज राहणार नाही. मात्र इतर खाजगी वाहनांनी व अन्य मार्गानी येणार्या चाकरमान्यांना ईपास घेवून जिल्ह्यात यावे लागणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
शासनाने गणेशोत्सवाबाबत धोरणे ठरवली असून याबाबत जीआरही निघाला आहे. कशेडी घाटात एसटीला थांबविले जाणार नाही. कशेडी घाटात गर्दी होते. लोकांची गैरसोय होत आहे. त्यासाठी एसटीला आता थांबविले जाणार नाही. दापोली मंडणगडसाठी स्वतंत्र व सिंधुदुर्गसाठी स्वतंत्र रूट करण्यात येणार आहे. तालुका लेव्हलरून स्क्रिनींग सेंटरची क्षमता वाढविण्यात येणार आहे. आणि त्या ठिकाणी येणार्या चाकरमान्यांना कोविडची लक्षणे आहेत व ज्यांना काही आजार असतील त्यांची सक्तीने अँटेजीन टेस्ट घेण्यात येणार असून त्यासाठी १५ हजार अँटीजेन टेस्ट किट मागवली आहेत. सध्या कोविड तपासणीसाठी जी यंत्रणा आहे त्याची क्षमताही दुप्पट करण्यात येणार आहे. होम क्वॉरंटाईनचा कालावधी १० दिवसांचा करण्यात आला आहे. त्याची गाईडलाईन आली की अंमलबजावणी केली जाणार आहे. सीसीसीची क्षमता दुप्पट करीत आहोत. होम क्वॉरंटाईन होणार्या लोकांना बाहेर फिरण्यास गणेश विसर्जनाच्या कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही. सार्वजनिक आरती, भजनामध्येही ते सहभागी होणार नाहीत. सध्या वैद्यकीय अधिकार्यांची संख्या अपुरी आहे यासाठी आयएम डॉक्टरांच्या संघटनेशी चर्चा झाली असून तसेच निमा संघटनेशी देखील चर्चा झाली आहे. त्यातील हायरिस्क असलेले सदस्य वगळून बाकी सदस्यांची आळीपाळीने कोविडसाठी ड्युटी लावणार आहोत. तसेच ग्रामीण भागातही डॉक्टर व नर्सेस आणले जाणार आहेत. लवकरात लवकर महिला रूग्णालयाचे कोविड रूग्णालय करण्यात येणार असून त्या ठिकाणी १०० बेडची सुविधा होणार आहे. कामथे व कळंबणी येथे देखील क्षमता वाढविली जाणार आहे. चतुर्थश्रेणी कामगारांवर ताण येत असल्याने अनेक ठिकाणी स्वच्छतेसाठी मशिन्स त्यामध्ये व्हॅक्युम क्लिनरसाखे आणण्यात येणार आहे. त्यामुळे कमी कर्मचारी वर्गात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता होवू शकणार आहे तसेच अशा कर्मचार्यांसाठी थेट नेमणूकही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सिव्हिल सर्जननी अशा ४६ कर्मचार्यांची थेट नेमणूक केली आहे. तसेच शासकीय यंत्रणेतील स्वच्छता कर्मचार्यांची देखील मदत घेतली जाणार आहे असेही त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com