
ऑनलाईनवरून महिलेची ८२ हजार रुपयांची फसवणूक
रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर साळवी स्टॉप येथे राहणार्या श्वेता साळवी यांची ऑनलाईनवरून अज्ञात इसमाने ८२ हजार २०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. यातील श्वेता साळवी यांनी विनसारी डॉट कॉम या वेबसाईटवरून गुगलपेद्वारे पेमेंट करून ड्रेसची ऑर्डर दिली होती. सदरची ऑर्डर आली नसल्याने फिर्यादी यांनी सदर साईटच्या ऑपरेटरना २९९ रुपये परत करण्यासाठी संपर्क केला होता. मात्र सदरच्या अज्ञात मोबाईल धारकाने फिर्यादीच्या गुगलपेचा उपयोग करून ८२ हजार २०१ रुपये काढून घेतले व त्यांची फसवणुक केली. याबाबत त्यांनी शहर पोलीस स्थानकात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com