५ ऑगस्टला श्रीराम मंदिर निर्माण भूमिपूजन सर्वांनी सणाप्रमाणे साजरा करावे ,रत्नागिरीतील विविध मंदिर संस्था व प्रतिष्ठान यांचे आवाहन
अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी श्री राम मंदिर निर्माण भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या दिवशी रत्नागिरीतील सर्व हिंदू बांधवांनी सणाप्रमाणे दिमाखात साजरा करू असे आवाहन रत्नागिरीतील विविध मंदिर संस्था व प्रतिष्ठान यांनी केले आहे.500 वर्षानंतर आपल्या हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण होणार बुधवार 05 ऑगस्ट 2020 हा हिंदुस्थानच्या इतिहासातील एक सुवर्ण दिन, सोनेरी पहाट. सोनेरी अक्षरात लिहिली जाणार आणि या ऐतिहासिक सोहळ्याचे आपण सर्व लहान, थोर, गरीब, श्रीमंत साक्षीदार होणार आहोत. हा बहुमान आपल्या पिढीला मिळतोय 500 वर्षानंतर आपल्या हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण होत आहे.हा सोहळा आपल्याला कोरोनाच्या संकटात देखील घरबसल्या साजरा करायचा आहे, हे कोरोनाचे संकट नसते तर आपण प्रत्यक्ष साक्षीदार झालो असतो, आपण थेट अयोध्येलाच गेलो असतो.तर चला मग दिमाखात साजरा करू श्री राम मंदिर निर्माण भूमी पूजनाचा कार्यक्रम
सर्व हिंदू बांधवाना, माता भगिनींना हा सण साजरा करण्यासाठी आवाहन करण्यात येते कि.
🚩 आपल्या घरावर गुढी अथवा भगवे ध्वज उभारावेत.
🚩आपल्या व्हाट्स अप चा DP श्री प्रभु रामांचा ठेवावा.
🚩 स्टेटस ला भूमी पूजनाचा फोटो ठेवावा.
🚩भगव्या रंगाची वस्त्र परिधान करावी किंवा फेटा घालावा.
🚩घरामध्ये गोडधोड पदार्थ करून सण साजरा करावा.
🚩सर्व धार्मिक स्थळांमध्ये, मंदिरामध्ये शासकीय नियमांचे पालन करून सकाळी 11:30 वाजता कमीत कमी दहा मिनिटे घंटा नाद करावा.
🚩 आप्तेष्ट, नातेवाईक, मित्र परिवार, सर्वांना शुभेच्छा द्याव्यात.
🚩भ्रमणध्वनीवर संपर्क केल्यावर जय श्री राम म्हणावे…
🚩मंदिर, घरे याठिकाणी रोषणाई करावी.
असे आवाहन श्री भैरी देवस्थान,श्रीराम मंदिर रामआळी, श्री हनुमान मंदिर सडा, श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय सेवा समीती, बजरंग दल, हिंदू जनजागृती संस्था, भारत रत्न प्रतिष्ठान अशा रत्नागिरीतील विविध संस्थांनी केले आहे.
www.konkantoday.com