
वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांची कमतरता, महाराष्ट्र समविचारी मंचाकडून उपोषणाचा इशारा
रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात गेली दहा बारा वर्षे अत्यावश्यक वैद्यकीय अधिकार्यांची कमतरता आहे. सध्या कोरोनाने रत्नागिरी जिल्ह्यात उग्र रूप धारण केले आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात निष्णात वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, वॉर्डबॉय, सफाई कामगार संख्येने कमी आहेत. तसेच कोरोना अनुमान तपासणी विभागात असणारे तज्ञदेखील कमी आहेत. या सर्वांमुळे आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होत आहे. सध्या सेवा बजावत असलेल्या अनेक परिचारिकांना कोरोनाची लागण झाली आहे. या परिचारिकांना होम क्वॉरंटाईन करणे गरजेचे आहे. सर्व विषयांवर संबंधित यंत्रणेचे तसेच शासनकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र समविचारी मंचच्यावतीने १५ ऑगस्ट रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन महाराष्ट्र समविचारी मंचचे राज्य सरचिटणीस संजय पुनसकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
www.konkantoday.com