
मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे चांदेराई बाजारपेठेत पाणी भरले
रत्नागिरी तालुक्यात काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस पडत असून रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई बाजारपेठ काजळी नदीला आलेल्या पुरामुळे चांदेराई भागात पाणी भरले आहे चांदेराई बाजारपेठेत देखील पाणी भरल्याने व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून सामान सुरक्षित हलविले आधीच गेल्या काही महिन्याच्या लोक डाऊन मुळे व्यापारी आर्थिकदृष्ट्या अडचणीत असतानाच आता या पुरामुळे व्यापारी अडचणीत येत आहेत याबाबत चांदेराई चे माजी सरपंच दादा दळी यांनी या सद्यस्थितीबाबत माहिती दिली आहे
www.konkantoday.com

