
निसर्ग वादळात बंद पडलेली इंटरनेट सेवा आयोगाच्या पत्रा नंतरही अजूनही बंदच
निसर्ग चक्री वादळाच्या आपत्तीने कोलमंडलेली मोबाईल आणि इंटरनेट सेवा 3 जून पासून ठप्पच असल्याने त्याचा थेट परिणाम हा ऑनलाईन शिक्षणावर होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले येथील कौमुदी जोशी हिने याबद्दलची तक्रार थेट राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाकडे केली होती.याबाबत आयोगाने पाठवलेल्या पत्रानंतरही इंटरनेट सेवा बंदच आहे. त्यामुळे वेळेत कार्यवाही न झाल्यास रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना आयोगासमोर प्रत्यक्ष हजर राहण्याचे समन्स बजावण्यात येईल असा इशारा आयोगाने दिला होता.
www.konkantoday.com