
जोरदार पावसामुळे नद्यांच्या पातळीत वाढ काही ठिकाणी किरकोळ नुकसान
रत्नागिरी जिल्ह्यात खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून काजळी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.
जिल्हा नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झालेल्या सकाळी 10 वाजेपर्यंतच्या माहितीनुसार जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती खालीलप्रमाणे आहे.
चिपळूण तालुक्यात मौजे मुंढे तर्फे चिपळूण येथे रामदास नारायण मोडक यांच्या घरावर झाड पडल्यामुळे अंशत: नुकसान झाले आहे. जिवीत हानी नाही.
रत्नागिरी तालुक्यात मौजे आदमपूर कर्ले येथील रस्त्यावर झाड पडल्याने सदर ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झाड हटविण्याचे काम सुरु आहे.
राजापूर तालुक्यात मौजे डोंगरगाववाडी येथे भिकाजी तांबे यांच्या पडवीचे पावसामुळे अंशत: नुकसान झाले आहे जिवीत हानी नाही.
www.konkantoday.com