
करोना रुग्णांची संख्या अशीच वाढायला लागल्यास मुख्यमंत्र्यांना कठोर निर्णय घ्यावा लागेल -उपमुख्यमंत्री अजित पवार
करोना रुग्णांची संख्या अशीच वाढायला लागल्यास मुख्यमंत्र्यांना कठोर निर्णय घ्यावा लागेल. त्या वेळी ठरेल त्याप्रमाणे राज्यभर त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत सांगितले.राज्यस्तरावर याबाबत विचारविनिमय सुरू झाला आहे. मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ स्तरावर निर्णय होतील त्याप्रमाणे त्या त्या भागात त्याची अंमलबजावणी करावी लागेल.
www.konkantoday.com