
गणेशोत्सवासाठी कोकणात येणार्या चाकरमान्यांसाठी क्वॉरंटाईनची तसेच ई पासची अट काढून टाकण्याची माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची मागणी
कोकणात येणार्या चाकरमान्यांसाठी राज्य शासनाने एसटी सोडण्याच्या व चाकरमान्यांना दहा दिवसांचा क्वॉरंटाईन करण्याचा निर्णय आज जाहीर केल्याने आता या निर्णयाविरोधात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी उडी घेतली आहे. त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, शासनाने चाकरमान्यांसाठी दहा दिवसांची क्वॉरंटाईनची अट घातली आहे. याबाबत आपले असे म्हणणे आहे की, कोकणात येणार्या चाकरमान्यांना एक दिवसही क्वॉरंटाईन ठेवू नये. तसेच सर्वांसाठी ई पासची अट काढून टाकावी अशी मागणीही राणे यांनी केली आहे. या अटी ताबडतोब शासनाने रद्द कराव्यात. कोकणासाठी नको त्या अटी शर्ती लादू नये. एक तर शासनाने एक रुपयाची मदत कोकणाला केली नाही, वादळात नुकसान झालेल्यांना अजून पैसा नाही आणि आमच्या आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या उत्सवाला सरकारने अटी टाकाव्यात हे योग्य नाही, या अटी काढून टाकाव्यात अशीही मागणी राणे यांनी केली आहे.
www.konkantoday.com