कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या अडचणी बाबत भाजपचे राज्यपालांना निवेदन

गणेशोत्सवासाठी मुंबई ठाण्यातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात आपल्या गावी जात आहे. परंतु सध्या त्यांची गैरसोय होत आहे. रायगडमधील खारपाडा, रत्नागिरीतील कशेडी आणि सिंधुदुर्गातील खारेपाटण येथील तपासणी नाक्यांवर पासेसमुळे किंवा प्रशासकीय यंत्रणेत समन्वय नसल्यामुळे चाकरमान्यांना आठ-आठ, दहा-दहा तास ताटकळत राहावे लागत आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील आमदारांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी भेट घेतली व त्यांना निवेदन दिले. याप्रकरणी राज्यपाल कोश्यारी यांनी तात्काळ मुख्य सचिवांशी संर्पक साधून कोकणात गणेशात्सवात जाणा-या चाकरमान्यांना त्रास होता कामा नये याची योग्य काळजी घ्या असे आदेश दिले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button