कापसाळ येथे अपघातात महिलेचा मृत्यू, तीन गंभीर

मुंबई-गोवा महामार्गावर कापसाळ धरणाजवळ एका दुचाकीला शेवोलेट एन्जॉय गाडीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात भिले बौद्धवाडीतील सुदेशिनी सकपाळ ही महिला जागीच मृत्यूमुखी पडली तर दोन्ही वाहनांतील अन्य तिघे जखमी झाले. . जखमींना तातडीने खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.
चिपळूण येथे एका खाजगी रूग्णालयात काम करणार्‍या सुदेशिनी सकपाळ (४०, रा. भिले बौद्धवाडी) यांना सावर्डे येथे मुलीकडे दुचाकी (क्र. एम.एच. ०८ एएच ०२५१) वरून सोडण्यासाठी दुचाकीवरून तिघे जात होते. चालक विनोद चव्हाण (रा. भोम) त्याच्यामागे सुदेश आमरे (रा. वैशी) व शेवटी सुदेशिनी सकपाळ बसल्या होत्या. यावेळी तळेगावाहून अंधेरी, मुंबईकडे जाणार्‍या शेवोलेट एन्जॉय गाडी (क्र. एमएच ०१ बीटी ९९०६) जात होती. चालक संकेत सुखदरे (रा. वरळी कोळीवाडा, मुंबई) हे होते. या गाड्या कापसाळ धरणाजवळ आल्या असता जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील सुदेशिनी सकपाळ या जागीच मृत्यूमुखी पडल्या. तर विनोद चव्हाण गंभीर जखमी झाला आहे.
www.konkantoday.co

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button