
स्कूटर घसरल्याने झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू
रत्नागिरी शहरातील स्टेट बँक कॉलनी जवळ स्कुटर घसरून झालेल्या अपघातात रहीसा मुस्ताक पांगारकर या महिलेचा मृत्यू झाला
रहीसा ही आपली मुलगी आरफा
हिच्या स्कूटरच्या च्या मागे बसून किर्ती नगर ते साळवी स्टॉप अशी येत असता स्टेट बँक कॉलनी समोरील रस्त्यावर अचानक ब्रेक लावल्याने त्यांची स्कूटर घसरून अपघात झाला या अपघातात दोघेही स्कूटरवरून खाली पडून जखमी झाल्या रहीसा यांच्या डोक्याला गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला
www.konkantoday.com
