सिंधुदुर्गात चाकरमान्यांच्या बाबतीत रॅपिड टेस्टचा निर्णय रत्नागिरीत मात्र अद्यापही निर्णय नाही?
गणेशोत्सव आता जवळ येत चालल्यामुळे खाजगी वाहने घेवून कोकणात येणार्या चाकरमान्यांबाबत सिंधुदुर्ग जिल्हाधिकार्यांनी निर्णय घेतले असून खारेपाटण येथे येणार्यांची रॅपिड टेस्ट घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. सुरूवातीला येणार्या चाकरमान्यांची रॅपिड टेस्ट घेण्यात येईल असे जाहीर करण्यात आले होते त्यानंतर मात्र त्यात बदल करण्यात येवून प्रशासनाला संशयास्पद वाटलेल्या चाकरमान्यांची रॅपिड टेस्ट घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे व त्यादृष्टीने पथकेही तयार करण्यात आली आहेत. एकीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याने सावधगिरीचे पाऊल उचलले असले तरी चाकरमान्यांच्या तपासणी बाबतीत रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने अद्यापही निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे कशेडी घाटातून व अन्य मार्गाने रत्नागिरी जिल्ह्यात येणार्या चाकरमान्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणे रॅपिड टेस्ट होणार की नाही याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
सिंधुदुर्गात एकीकडे चाकरमान्यांच्या बाबतीत सावधगिरीची पावले उचलली असताना रत्नागिरी जिल्हा प्रशासन चाकरमान्यांच्या तपासणीबाबत काहीही स्पष्टीकरण करत नसल्याने संभ्रमात वाढ होत आहे.
www.konkantoday.com