
राज्यात खासगी बसेसना परवानगी एसटीला मात्र नाही शासनाच्या निर्णयाबद्दल कर्मचारी संघटनेची नाराजी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रेल्वे, खासगी प्रवासी वाहतूक आणि एसटी सेवा बंदचा निर्णय घेतला मात्र, सध्या खासगी बस वाहतूकदारांकडून सर्रास प्रवाशांची आर्थिक लूट करत प्रवासी वाहतूक करत आहे. मात्र तरीसुद्धा एसटीची सेवा मात्र बंदच आहे. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झाला असल्याने राज्यातील 1लाख एसटी कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई उपनगरासह राज्यात खासगी बसमनमानी भाडे आकारून प्रवाशांकडून दोन्ही बाजूचे भाडे आकारल्या जात आहे. प्रवाशांचे आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे घेऊन खासगी वाहतूकदार प्रवाशांची ई-पास तयार करत आहे. अनेक वेळा वाहनांमध्ये विना ई-पास प्रवाशांची अवैध वाहतूक सुद्धा केली जात असल्याचे आरटीओ विभागाच्या कारवाईत आढळून आल्याचे दिसून येत आहे.कोरोना संदर्भातले सुरक्षिततेचे नियम घालून सरकारने जिल्ह्याच्या बाहेर वाहतूक करायला एसटीला परवानगी दिली पाहिजे. खासगी वाहतूकदार प्रवाशांना लुटत आहेत. हजारोंच्या संख्येने खासगी वाहने सुरक्षितततेचे नियम तोडून कोकणात गणपती सणाला प्रवासी वाहतूक करत आहे. कर्नाटक, आंध्र, गुजरात,तेलंगणा या राज्यांमध्ये तेथील एसटी जिल्ह्याबाहेर प्रवासी वाहतूक करत असताना राज्यातील एसटीला प्रवासाची परवानगी का नाही ? खाजगी वाहतूकदारांशी साटेलोटे असल्याचा संशय येत आहे येत असल्याचा अनुभव एसटी कामगार संघटनेच्या नेत्यांनी केला आहे
www.konkantoday.com