यावर्षी साधेपणाने गणपती उत्सव साजरा करावयाचा असल्यामुळे यंदा गावात येऊ नका -खासदार विनायक राऊत यांचा सल्ला
यावर्षी मुंबईकर चाकरमान्यांनी गावाकडे येऊ नये. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी साधेपणाने गणपती उत्सव साजरा करावयाचा असल्यामुळे यंदा गावात येऊ नका, असा सल्ला रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी चाकरमान्यांना दिला आहे
चिपळूण येथे पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, पं. स. सभापती धनश्री शिंदे, गटविकास अधिकारी सरिता पवार व मान्यवर उपस्थित होते.चाकरमान्यांनी गावामध्ये कोणीच नसेल तर आणि अत्यावश्यक गरज असेल तरच गावाला यावे. अन्यथा गणपती उत्सवासाठी गावी येऊ नये. कोरोना संपल्यानंतर पुढच्या वर्षी आपण अधिक उत्साहात हा सण साजरा करूया. ज्यांचे घर बंद असेल व ज्यांना खरोखर गरज असेल त्यांनी शासकीय नियमांचे पालन करून गावाला यावे, असे आवाहन केले आहे.चौदा दिवसांच्या क्वारंटाईनबाबत विचारले असता ते म्हणाले. याबाबत राज्य शासन चर्चा सुरू आहे मात्र, सद्यस्थितीत या 14 दिवस घरीच राहणे बंधनकारक आहे.
www.konkantoday.com