रत्नागिरी येथील शासकीय कोविड रुग्णालयात आरोग्य सेवा बजावणाऱ्या परिचारिकांचे तपासणी अहवाल येण्यास उशीर
रत्नागिरी येथील शासकीय कोविड रुग्णालयात परिचारिका व अन्य पदांची कमतरता असूनही आहे अपुऱ्या सुविधा च्या परिस्थितीत गेले चार महिने परिचारिका व अन्य कर्मचारी रुग्णांची सेवा करीत आहेत परंतु हळूहळू आता या आरोग्य कर्मचाऱ्यांनाच कोरोना ची लागण होऊ लागली आहे काल झालेल्या अहवालामध्ये अतिदक्षता विभागातील एक तर संभाव्य कोरोना कक्षातील एक अशा दोन परिचारिकांना कोरोनाची लागण झाली आहे याशिवाय अतिदक्षता विभागातील एक परिचारिका गेले दोन दिवस तापाने हैराण असून तिचा स्वाब घेऊनही अद्याप अहवाल आलेला नाही रत्नागिरी शासकीय रुग्णालयात कोरोना तपासणीची लॅब झाली असून अहवाल तात्काळ मिळणे अपेक्षित आहे मात्र रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिकांचे अहवाल देखील उशिरा येत असल्याने त्यांच्या कुटुंबियांच्या चिंता निर्माण झाली आहे
www.konkantoday.com