
शिक्षक, पदवीधर निवडणूक पुढे ढकलली
निवडणूक आयोगाकडून २ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेची १० जून २०२४ रोजी घेण्यात येणारी द्विवार्षिक निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून, या निवडणुकीसाठी सुरू असलेली आचारसंहिताही मागे घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. या चार जागांसाठी १० जून २०२४ रोजी मतदान होणार होते, तर १३ जूनला मतमोजणी केली जाणार होती. शाळांमधील उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर ही निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. आयोगाने या संदर्भात विचारविमर्श करून महाराष्ट्र विधान परिषदेच्या उक्त द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम नंतरच्या तारखेपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबरचे परिपत्रकही जाहीर केले आहे. www.konkantoday.com