जिल्ह्यात कळंबस्ते गावाने निर्माण केला आदर्श, संदिग्ध रूग्णांना कोविड सेंटरची उभारणी
कोविड सेंटरमध्ये कोरोना बाधित रूण्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येथे दाखल होणार्या रूग्णांना योग्य सुविधा मिळत नाहीत. याबाबत सतत ओरड होत होती. त्यामुळे संदिग्ध रूग्णांना कोविड सेंटरमध्ये न पाठवता कळंबस्ते गावातील जिल्हा परिषद शाळेत क्वॉरंटाईन करण्याचा निर्णय येथील कळंबस्ते ग्रामपंचायत, ग्रामकृती दल, गावातील सामाजिक संस्था यांच्याशी चर्चा करून सरपंच व सर्व ग्रामस्थांनी एकत्र निर्णय घेतला आहे. शासनाचे त्याला सहकार्य मिळेल व कोविड सेंटरवरील ताण कमी होण्यास मदत होईल असे उपसरपंच विवेक महाडीक यांनी सांगितले.
www.konkantoday.com