
कारवांचीवाडी येथे घरफोडी
रत्नागिरी : कारवांचीवाडी येथील बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून रोख रक्कम आणि दागिने असा एकूण 30 हजार रुपयांचा ऐवज लांबवला. ही घटना शुक्रवार 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6.45 वा. कालावधीत घडली. याबाबत केतन सुभाष नांदगावकर (वय 31, रा. कारवांची वाडी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ते कामानिमित्त घर बंद करून बाहेर गेले होते. सायंकाळी ते घरी परतले असता बेडरूममधील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. तसेच कपाटातील सोन्याची अंगठी, चांदीचा छल्ला, रोख 5 हजार रुपये असा एकूण 29 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून अधिक तपास पोलिस करत आहेत.